पोलिस मित्र संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उत्कृष्ट...

पोलिस मित्र संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पूजा जागडे, आरती चौंधे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चिलेकर, चेतन शिंदे, श्रीमंत दगडूशेठ गणपती आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी , कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र कपोते, सनी निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.